नमस्कार मित्रानो आपल्या घरातील लहान बाळ यांना बेबी कीट कसे घ्यावे व त्या मध्ये कोणत्या वस्तू आहेत ते या लेखनातून दिले आहे.
महाराष्ट्रात महिला व बालविकास विभाग ही योजना
राबविणार आहे. राज्यातील नवजात बालकांना बेबी केअर कीट देण्याचा प्रस्ताव राज्य
सरकारच्या विचाराधीन होता. त्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
राज्यात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये
गर्भवतींनी नावनोंदणी करून त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना पहिल्या
प्रसूतीवेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी सरकारतर्फे दोन हजार रुपयांचे बेबी केअर
किट बॅग मोफत देण्यात येणार आहे. ही योजना २६ जानेवारीपासून राज्यात लागू होणार
आहे. दोन हजार रुपयांच्या रकमेच्या या किटमध्ये सुमारे १७ विविध वस्तूंचा समावेश
आहे. ही योजना सरकारी रुग्णालयात प्रसूती झालेल्या सर्व वर्गातील महिलांसाठी लागू
आहे. गर्भवती असताना सरकारी हॉस्पिटलमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थी योजनेस पात्र
राहतील. अंगणवाडी सेविकेला माहिती किंवा अर्ज दिल्यानंतर त्यांच्यामार्फत बेबी
केअर किट देण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अधिकारी किंवा बाल
विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येतील.
योजनेचा आढावा घेण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला
आहे.

0 Comments